आदिवासी गोंड राजा महात्मा रावण म्हणजे राक्षस , सामान्य माणसांना त्रास देणारा दानव अशी मालिन प्रतिमा ,इतिहासकारांनी रावणाच्या माथी मारून ठेवली त्यांना हवा तसा अर्थ त्यांनी आपल्याला ग्रंथामध्ये लिहून ठेवला. हा इतिहास खरा आणि ग्रंथांना अनुसरून सतसतविवेक ,बुद्धीला विचार करण्याच्या व रामभक्त विचारवंतांनी विचार केला तर.......
रावण हा इतिहासातील एक अत्यंत श्रीमंत आणि धनदांडगा राजा होत. तर राम हा एक आर्य राजकुमार. इतिहास सांगतो कि रामाच्या सावत्र आई ला दशरथ या रामाच्या पित्ताने दिलेल्या वाचनामुळे वनवासात जावे लागले. या वनवासात राम एकटा न जाता त्याची पत्नी व धाकटा भाऊ पण होता. वनवासात असताना जो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो अशा रामाच्या धाकट्या भावाने म्हणजेच लक्ष्मणाने रावणाची बहीण म्हणजे सुर्पणखा हिचे नाक व कान कापले. एका स्त्री सोबत एवढे असभ्य वर्तन केले तरी रामाचा भाऊ बदनाम ठरत नाही इतिहासकार त्याला गुन्हेगार ठरवत नाहीत.
त्याचा सुर्पणखेने घडलेला प्रकार आपल्या भावाला म्हणजेच राजा रावणाला सांगितला आपल्या बहिनिला दिलेला येवडा त्रास व तिचा केलेला अपमान रावणाला सहन झाला नाही. (आधुनिक काळातील कोणत्याच भावाला आपल्या बहिणीचा केलेला एवढा मोट अपमान सहन होणार नाही म्हणजे रावणाला राग येणे साहजिकच )
आपल्या बहिणीवर झालेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने रामाच्या पत्नीला उचलून आणले.
[रामायणातील रामाकडून झालेली एकच चूक ती म्हणजे एका स्त्रीला उचलून आपल्या विमानात बसून आपल्या राज्यात आणले ]
सीतेला रावणाने लंकेत नेल्यावर सन्मानाने अशोक वाटिकेत ठेवले. तिच्या सेवेसाठी अनेक दासी ठेवल्या एवढे दिवस सीतेला लंकेत ठेवले. परंतु कधीही स्पर्श मात्र रावणाने सीतेला केला नाही. या उलट त्याच्या पत्नीला देखील सीतेच्या सेवेसाठी ठेवले.
राजा रावण एक महान राजा होता त्याने सीतेला कसला त्रास देखील दिला नसेल जेवढा लक्ष्मणाने शुर्पणखेला दिला. केवळ आपल्या बहिणीवर झालेल्या अपमानाचा बदला घेणे एवढाच उद्देश होता.
या घटनेच्या उलट गोष्टी मर्यादा पुरोषोत्तम असलेल्या रावणाच्या होत्या. रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा राम आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या घरी गेला तेव्हा देखील त्याचा आपल्या स्वतःच्या पत्नीवर विश्वास नव्हता.
अग्निपरीक्षेसारखा घटनेचा सामना रामाने आपल्या पत्नीला करायला लावला त्याच्याकडे एवढी ताकद तर नक्कीच होती कि तो आपल्या पत्नीला अग्निपरीक्षेपासून वाचवू शकत होता. पण रामाला स्वतःचा आपल्या पत्नीवर विश्वास नव्हता.
अग्निपरीक्षेचा सामना करून देखील सीता पवित्र झाली नाही गरोदर अवस्थेत असताना कोणी तरी अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून तिच्या पोटात असणार बाळ रामाचे नाही या संशया वरून सीतेला परत जंगलात पटवून दिले.
सीतेवर एवढा अन्याय करून देखील राजा राम हा मर्यादा पुरुषोराम ठरतो. सीतेला कुठल्याही प्रकाराला त्रास न देता महात्मा रावण मात्र काही इतिहासकारांनी दानव ठरवला संपूर्ण रामायणाचा अभ्यास जरी केला तरी महात्मा रावण हा रामापेक्षा श्रेष्ठच ठरवतो.
जो स्त्रीचा आदर करतानाहि त्याला देव ठरवण्यापेक्षा जो राजा एका परस्रीला आपल्या मातेसमान मानतो तो राजा रावण माझ्यासाठी
देवा सारखाच.....................
Post a Comment